Breaking News : आता महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी नुकतीच केली. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून, तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सेमिस्टर पॅटर्न अंतर्गत बोर्डाच्या परीक्षाही वर्षातून २ वेळा होणार की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. शिवाय, इंजिनियरिंग आणि मेडिकल हे अभ्यासक्रमही पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे.

शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठरावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारही याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून, तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवं शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदलही करण्यात आले आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत १०+२ असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख नव्या शैक्षणिक धोरणात केलेला नाहीत. त्यामुळे १०+२ ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी ५+३+३+४ अशी नवी व्यवस्था लागू होणार आहे.

PAN Card – पॅन आधार लिंकवर केंद्राची नवीन नियमांची घोषणा, त्याचा आपल्या लोकांना किती फायदा होईल?

नव्या शैक्षणिक धोरणातील महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • १०+२ ऐवजी आता शिक्षणाचा ५+३+३+४ चा नवा पॅटर्न
  • पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच
  • पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न
  • सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश
  • स्वतः विद्यार्थी, सहविद्यार्थी आणि शिक्षक करणार मूल्यांकन
  • शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर
  • सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता

पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्ष : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
दुसऱ्या टप्पा म्हणजे पुढील तीन वर्ष : इयत्ता तिसरी ते पाचवी
तिसऱ्या टप्पा म्हणजेच त्यानंतरची तीन वर्ष : सहावी ते आठवी
चौथ्या टप्पा म्हणजेच उर्वरित चार वर्ष : नववी ते बारावी

Post Office Yojana – पोस्ट ऑफिसमध्ये फक्त रु 1000 च्या गुंतवणुकीवर दरवर्षी 7.4% हमी परतावा मिळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top