उत्पन्नाचा दाखला काढा
त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावि लागेल. तिथे वेबसाईट वर मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडण्याचा पर्याय आहे. त्यावर आपणास नवीन नोंदणी करावी लागेल .
ज्याच्या नावे दाखला काढायचा आहे त्याच्या नावे नोंदणी करावी लागेल; तिथे आपला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर OTP द्वारे आपला मोबाइल नंबर पडताळावा लागेल .
पुढे एक युजरनेम बनवून पासवर्ड तयार करावा व त्यानंतर पुढे नाव आणि जन्मतारीख टाकून अकाउंट तयार करावे, तसेच आधारकार्ड वरील नावदेखील टाकावे. अकाउंट तयार झाल्याचा संदेश प्राप्त होईल. त्यानंतर लॉगिन करावे .
लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला सर्वात खाली महसूल विभाग असे आहे . महसूल विभाग निवडल्यानंतर उपविभाग मध्ये महसूल सेवा निवडावे, तिथे सर्वात खाली उत्पन्नाचा दाखला असा पर्याय आहे, तो निवडा, पुढे प्रोसिड वर क्लिक करा . पुढे उत्पन्नाचा दाखला असा पर्याय निवडावा तिथे तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल,
१. ओळखीचा पुरावा (कोणतेही एक ); आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र
२ .पत्त्याचा पुरावा; पासपोर्ट / रेशन कार्ड /मतदार ओळखपत्र /आधार कार्ड /वीज बिल / वाहन चालवण्याचा परवाना
३ .जर तुमचे वय १८ वर्षापेक्षा कमी असेल तर; जन्माचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
उत्पन्नाचा दाखला १५ दिवसात तहसीलदारमार्फत मिळतो. उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तूम्हाला उत्पन्न वर्ष निवडावे लागेल . (१ किंवा ३ वर्ष )
अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा व नंतर आपला व्यवसाय निवडा. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकावा.
खाली I agree वर क्लिक करा.
त्यानंतर समाविष्ट करावे वर क्लिक करा.
1. फोटो (१६०pixel *२००pixel ) (५ ते २० kb)
2. ओळखीचा पुरावा (७५ ते १०० kb)
3. वयाचा पुरावा (१८ वर्षाखालील व्यक्तीसाठी फक्त )
4. उत्पनाचा पुरावा (कोणतेही एक )
* तलाठी प्रमाणपत्र
* स्वघोषणापत्र.
पेमेंट करताना PAYTM चा वापर करा अतिशय सोपी पद्धत आहे त्यासाठी तिथे असलेला QR Code कोणत्याही BHIM UPI ने scan करावा आणि उत्पनाचे प्रमाणपत्र हे ३ कार्यालयीन दिवसात मिळेल.
या पद्धतीने तुम्ही घरबसल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवू शकता .
Pingback: Income certificate online: घरबसल्या काढा उत्पन्नाचा दाखला फक्त 10 मिनिट मध्ये; संपूर्ण माहिती जाणून घ्या - Medmappers