LIC Tech Term Plan – LIC ने नवीन प्लॅन ची केली सुरुवात, जाणून घ्या फायदे

LIC Tech Term Plan

एलआयसी टेक टर्म प्लॅन – LIC ने नवीन प्लॅन ची केली सुरुवात, जाणून घ्या फायदे LIC Tech Term Plan.

LIC Tech Term Plan 

नमस्कार मित्रांनो, LIC Tech Term Plan एलआयसी ने नवीन टर्म इन्शुरन्सची सुरुवात केली आहे. आपण या मध्ये LIC Tech Term Plan चे फायदे, वैशिष्ट्य, इत्यादी विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

टर्म लाईफ इन्शुरन्स हा जीवन विमा खरेदी करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. हा सर्वात स्वस्त आणि चांगला जीवन विमा आहे. LIC Jivan Amar Plan हा एक टर्म प्लॅन आहे. हा प्लॅन तुम्ही कोणत्याही LIC एजंट द्वारे खरेदी करू शकता. तसेच LIC ने एक नवीन प्लॅन सुरू केला आहे. त्या प्लॅन चे नाव LIC Tech Term Plan आहे. हा प्लॅन तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

LIC Tech Term Plan

एल आय सी टेक टर्म ही एक मुदत विमा योजना आहे. जर हा विमा भरणे चालू आहे आणि त्यामध्येच जर विमा भरणाऱ्या धारकाचा काही कारणाने मृत्यू झाला, तर त्या धारकाच्या नॉमिनीला विम्याची रक्कम देण्यात येते. पॉलिसीची मुदत संपल्यावर पॉलिसी धारक जिवंत असेल तर त्याला काहीही दिले जात नाही.

या मध्ये फक्त ऑनलाईन पद्धतीने खाते उघडता येते. LIC जीवन अमर हा प्लॅन मध्ये तुम्ही ऑनलाईन खाते उघडू शकत नाहीत, तसेच LIC Tech Term मध्ये तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने च खाते उघडू शकता. हा या दोन्ही LIC प्लॅन मधील फरक आहे.
LIC Tech Term मध्ये प्रवेश करणाऱ्याचे वय हे 18 वर्ष ते 65 वर्षाच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे.

मॅच्युरिटीच्या वेळी लाभार्थ्यांचे कमाल वय 80 वर्ष असावे.

या प्लॅन ची किमान विमा रक्कम 50 लाख रुपये आहे. आणि कमाल विमा रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही.
LIC Tech Term पॉलिसीचा कालावधी हा 18 ते 40 वर्षे आहे.

यामध्ये तुम्ही सिंगल प्रीमियम, मर्यादित प्रीमियम, नियमित प्रीमियम द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला एका प्रीमियम प्लॅन मध्ये फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल.
तसेच मर्यादित प्रीमियम पर्यायामध्ये तुम्हाला काही वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल.
आणि नियमित प्रीमियम पर्यायामध्ये तुम्हाला पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीसाठी पैसे भरावे लागतील.

तुमच्या कडे Level Sum Assured आणि Increasing Sum Assured असे जीवन विम्याचे दोन पर्याय आहेत.

Level Sum Assured – या मध्ये तुमच्या जीवन विम्याची रक्कम पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत सारखीच राहते. म्हणजे तुम्ही जर 50 लाख रुपयांचा विमा खरेदी केला आहे आणि तुमच्या पॉलिसी ची मुदत 20 वर्षापर्यंत आहे. तर तुमचा जीवन विमा 50 लाख रुपयांच्या संपूर्ण कालावधी साठी तसाच राहतो.

Increasing Sum Assured – या मध्ये पहिल्या 5 वर्षे जीवन विमा एकसमान राहतो. परंतु 6 व्या ते 15 व्या पॉलिसी वर्षापासून जीवन विमा हा दरवर्षी 10% ने वाढतो.
म्हणजे समजा तुम्ही 50 लाख रुपयांचा विमा खरेदी केला आणि त्या पॉलिसीची मुदत 20 वर्षापर्यंत आहे. तर पहिल्या 5 वर्षासाठी जीवन विमा फक्त हा 50 लाख रुपयांचा असेल. परंतु 6 व्या वर्षापासून दर वर्षी 10% ने वाढेल. कमाल मूळ विमा रक्कमेच्या दुप्पट असू शकते.

म्हणजेच 1 कोटी होईल. विमा 6 व्या वर्षी 55 लाख रुपये, तसेच 7 व्या वर्षी 60 लाख रुपये, 8 व्या वर्षी 65 लाख रुपये, 9 व्या वर्षी 70 लाख रुपये, 10 व्या वर्षी 75 लाख रुपये होईल. असेच 15 व्या वर्षी हा विमा 1 कोटी रुपयांचा होईल. त्यानंतर या विम्याच्या रक्कमेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. 16 ते 20 वर्षापर्यंत या विम्याची रक्कम फक्त 1 कोटी रुपये राहील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top