Rohit Pawar : कर्जतमध्ये MIDC यायलाच हवी, रोहित पवार मागणीवर ठाम; त्या टी-शर्टवर नेमकं काय लिहिलंय पाहा…

Rohit Pawar : कर्जतमध्ये MIDC यायलाच हवी, रोहित पवार मागणीवर ठाम; त्या टी-शर्टवर नेमकं काय लिहिलंय पाहा…

Rohit Pawar : कर्जतमध्ये MIDC यायलाच हवी, रोहित पवार मागणीवर ठाम; त्या टी-शर्टवर नेमकं काय लिहिलंय पाहा…

कर्जतमध्ये एमआयडीसी यावी, यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे आग्रही आहेत. मागच्या काही दिवसांपासून रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. अशातच रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी भर पावसात उपोषणही केलं. रोहित पवार यांनी आज हटके टी-शर्ट परिधान करत अधिवेशनाला हजेरी लावली. या टी-शर्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

रोहित पवार आज अधिवेशनाला दाखल झाले तेव्हा त्यांनी क्रिम कलरचं टी-शर्ट घातलं होतं. यावर कर्जत एमआयडीसीबाबत भाष्य करण्यात आलं आहे. या टी-शर्टवर समोच्या बाजूला मोठ्या अक्षरात MIDC असं लिहिण्यात आलंय. तर पाठीमागच्या बाजूला “ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया, आणि फक्त मुद्दयाचं बोलूया!”, असं लिहिण्यात आलं आहे.

रोहित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दोघे एकाच वेळी अधिवेशनाला पोहोचले. यावर बोलताना उदय सामंत आणि मी योगायोगाने एकत्र अधिवेशनाला आलो, असं रोहित म्हणाले.

रोहित पवार यांनी याबाबत ट्विटही केलं आहे. यात त्यांनी या टीशर्टच्या मागची गोष्ट सांगितली आहे.

रोहित पवार यांचं ट्विट

माझ्या मतदारसंघातील MIDC सह सर्वच युवांसाठी महत्त्वाचा असलेला रोजगाराचा विषय अधिवेशनात लावून धरल्याने मतदारसंघाबाहेरच्या एका मित्राने हा टी-शर्ट भेट दिला. शिवाय

‘ध्येय विकासाचं ठेवूया वेध भविष्याचा घेऊया युवाशक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्द्याचं बोलूया!

हा मनातला निश्चियही त्या टी-शर्टवर रेखाटत युवांच्या मुख्य प्रश्नांवरून ढळायचं नाही, हा मेसेज देण्याची त्याची कल्पना आवडल्याने आज हा टी-शर्ट घालूनच विधानभवनात प्रवेश केला…

कर्जत एमआयडीसीचा प्रश्न आता अधिकच तीव्र होत चालला आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी काल पुण्यात आले होते. तेव्हा त्यांचा ताफा ज्या भागातून जाणार होता तिथे काही युवक कर्जत एमआयडीसी संदर्भातला पोस्टर घेऊन उभे होते. त्याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

रोहित पवार यांचं ट्विट

माझ्या मतदारसंघातील #MIDC च्या मागणीचा आवाज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या युवांनी केला. त्यांचा हा आवाज किमान राज्य सरकार तरी ऐकेल आणि #MIDC ची अधिसूचना काढण्याची कार्यवाही करेल, ही अपेक्षा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top